ग्रामपंचायत सोगवे

  सोगवे हे महाराष्ट्र राज्यातील पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यात वसलेले एक निसर्गरम्य व आदिवासी बहुल गाव आहे. २०११ च्या भारतीय जनगणनेनुसार या गावाची एकूण लोकसंख्या २,४८५ असून त्यामध्ये १,२०५ पुरुष व १,२८० महिला आहेत. ० ते ६ वयोगटातील बालसंख्या ४९१ असून त्यात २४५ मुलगे व २४६ मुली आहेत. अनुसूचित जाती (SC) लोकसंख्या १० असून अनुसूचित जमाती (ST) लोकसंख्या २,४४८ आहे, त्यामुळे गावात आदिवासी समाजाचे वर्चस्व आहे. साक्षरतेच्या दृष्टीने गावात ८२० साक्षर तर १,६६५ निरक्षर लोक आहेत, ज्यामुळे शिक्षणाचा प्रसार करण्याची गरज दिसून येते. सोगवे गावातील लोकांचा मुख्य व्यवसाय शेती असून विशेषतः भात शेती मोठ्या प्रमाणावर केली जाते. याशिवाय आदिवासी समाजातील लोक शेतमजुरी, वीटभट्टी काम, बांधकाम कामगार म्हणूनही काम करतात, तसेच कुक्कुटपालन, बकरीपालन व काही प्रमाणात मच्छीमारी हे पूरक व्यवसायही केले जातात. गावात आदिवासी संस्कृतीचा मोठा प्रभाव असून वारली कला, पारंपरिक नृत्य व सण-उत्सव मोठ्या उत्साहात साजरे केले जातात. विशेषतः गणेशोत्सव, दिवाळी, होळी तसेच स्थानिक आदिवासी सणांना गावात महत्त्व आहे.

लोकसंख्येची माहिती

 
क्रमांकक्षेत्रतपशील
एकूण लोकसंख्या
२४८५ 
पुरुष लोकसंख्या
१२०५ 
महिला लोकसंख्या
१२८० 
०–६ वर्षे वयोगटातील लोकसंख्या
४९१ 
अनुसूचित जाती (SC %)
१० 
अनुसूचित जमाती (ST %)
२४४८ 

उपलब्ध पायाभूत सुविधा

क्रमांक सुविधा प्रकार उपलब्ध (होय/नाही) संख्या रस्त्याने जोडलेले (होय/नाही)
ग्रामपंचायत कार्यालय होय होय
प्राथमिक आरोग्य केंद्र (PHC)      
उपकेंद्र (Sub Center)    
अंगणवाडी  होय ४   होय
प्राथमिक शाळा  होय  ५  होय 
माध्यमिक शाळा      
उच्च माध्यमिक शाळा      
महाविद्यालय / व्यावसायिक केंद्र      
समुदाय भवन (Community Hall) होय   १   होय
१० स्वस्त दर दुकान (PDS)  होय  १  होय 
११ श्मशानभूमी / स्मशानभूमी होय   १   होय
१२ इंटरनेट / मोबाईल टॉवर      
१३ सीएससी केंद्र (CSC Center)  होय  १   होय

प्रशासकीय संरचना

ग्रामपंचायत बँक माहिती

खाते नाव: GRAM PANCHAYAT SOGAVE BELKHEDE 

बँकेचे नाव : THE THANE DISTRICT CENTRAL CO. OP. BANK LTD.

शाखेचे नाव: DAHANU

अकाउंट नंबर : 001800340000346

आई एफ एस सी कोड : TOC100000181

पत्ता : ग्रामपंचायत सोगवे मु. सोगवे पो. जामशेत, ता. डहाणू ,जि. पालघर .